चिपळुण : नाले-ओढे बुजवल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर

Jul 16, 2024 - 11:09
Jul 16, 2024 - 11:12
 0
चिपळुण : नाले-ओढे बुजवल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर

चिपळूण : चिपळुणातील नाले, पऱ्हे आणि गटार तुंबल्याने शहर परिसरात पाणी भरले. गेल्या चोवीस तासांत चिपळूण परिसरात सुमारे २५० मि. मी. पाऊस झाला, नदीकिनारी वाशिष्ठीचे पाणी शिरणे हे नित्याचेच आहे. मात्र, शहर परिसरातील पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने रस्त्यावर पाणी भरल्याचे या पावसाने दाखवून दिले.

चिपळूणात वाशिष्ठी, शिव नदीतील गाळ काढल्याने पुराची तीव्रता कमी झाली आहे. शनिवारी, रविवारी सुमारे २५० मि.मी. पाऊस होऊनदेखील चिपळूणात धोकादायक स्थिती आलो आहे. पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. या पाण्याचा जनजीवन्यवर परिणाम झाला होता. मात्र, सुदैवाने पावसाचा जोर कमी झाला आणि कोळकेवाडी येथील विद्युत जनित्र योग्यवेळी बंद करून त्यावर नियंत्रण राखल्याने धोका टळला, परंतु दुसऱ्या बाजूला शहरातील नाले, पऱ्हे बंद झाल्याने विविध भागांत पाणी साचल्याचे यावेळी निदर्शनास आले. मुंबई-गोवा महामार्ग, डीबीजे महाविद्यालयाच्या समोरील रस्ता, पोलिस लाईन, चिंचनाका या भागात पाण्याला जायला वाट नसल्याने महामार्गावर पाणी साचले. वालोपे येथील मारुती शोरुमच्या जवळदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले. चौपदरीकरणांतर्गत बांधण्यात जालेल्या गटारांचे नियोजनदेखील चुकीच्या पद्धतीने झाले आहे. या गटारात डोंगर उतारावरून येणारे पाणी वाहून जाईल, अशी कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. फक्त महामार्गावरील पाणी या गटारातून जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे ही गटारे असून नसल्यासारखी आहेत. बहादूरशेख चौक ते कापसाळपर्यंत अशीच परिस्थिती आहे. एका बाजूला डोंगर मधोमध महामार्ग त्यामुळे या महामार्गामुळे डोंगर उतारावरील पाणी अडत आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने हे पाणी नैसर्गिक नाल्यातून योग्यप्रकारे वाहून जाईल, याची व्यवस्थाच केलेली नाही. परिणामी चिपळूण पोलिस ठाण्यात रविवारी पाणी शिरले. अजूनही चिपळूण शहरातील उड्डाणपुलाचे काम होणे बाकी आहे. त्यामुळे वेळ गेलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाने डोंगर उतारावरील पाणी नैसर्गिक नाल्यातून कसे वाहुन जाईल आणि हे पाणी योग्यप्रकारे वाशिष्ठीला कसे मिळेल, याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने नैसर्गिक नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करणे अपेक्षित असून, सुरुवातीला या नाल्यांचे रेखांकन करणे गरजेचे आहे.

भोगाळेमध्येदेखील नैसर्गिक नाल्याला छोट्या मोऱ्या ठेवल्याने पाणी वाढले म खूप वेळ चिंचनाक्यामध्ये पाणी साचले होते. शहरातील अनेक नैसर्गिक नाले, पऱ्हे बुजविल्याने, तर काही ठिकाणी त्याना स्लॅब घालून इमारती उभारल्याने डोंगर उतारावरून येणारे पाणी वाशिष्ठी व शिव नदीला न मिळता ते रस्त्यावरून वाहत आहे. याची पालिकेने गंभीर दखल येणे गरजेचे आहे. रविवारी अनेक भागांत नाले, ओड्यांचे पाणी रस्त्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यामुळे ही पूर परिस्थिती तुंबलेल्या पाण्यामुळे होती असे स्पष्ट होत आहे.

डोंगरावरून येणारे पाणी वाशिष्ठी नदीला मिळण्याचे नियोजन नाही
मुंबई-गोवा महामागांच्या समांतर असा एक डोंगर आहे. या डोंगरावरून देणाऱ्या पावसाच्या पाण्याला मध्यमार्ग पार करून जाणे अपेक्षित आहे; मात्र चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात येणारा पाण्याचा लोंढा महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी आणि त्यानंतर हे पाणी पुढे शिव नदी किवा वाशिष्ठीला मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आलेले नाही. यामुळे पाण्याचा येणारा लोंढा अडतो आणि हे पाणी महामार्गावर येते यामुळे महामार्गावरील वाहतूकदेखील ठप्प होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow