चिपळूण : वन विभागाकडून मगरींबाबत जनजागृती

Jul 30, 2024 - 14:44
Jul 30, 2024 - 14:47
 0
चिपळूण : वन विभागाकडून मगरींबाबत जनजागृती

चिपळूण : वन विभाग चिपळूण यांच्या मार्फत चिपळूण पेठमाप येथे मगरीबाबत जन जागृती अभियान राबविण्यात आले. चिपळूण शहरात मागील काही दिवसांपूर्वी लोकवस्तीत मगरी येण्याच्या घटना घडल्या असल्याने यावर उपाययोजना म्हणून महाराष्ट्र शासन वन विभाग चिपळूण, वन परिक्षेत्र चिपळूण यांच्यामार्फत वन्यजीव मगर या उभयचर प्राण्याबाबत जनजागृती करून नागरिकांच्या मनामधील शंकेचे निरसन करण्यात आले. 

तसेच मगरीबाबतचे गैरसमज दूर करुन वन्यजिवांसह सहजीवन असा नागरिकांमध्ये संदेश देण्यासाठी पेठमाप येथील श्री विठ्ठल मंदिरात ग्रामस्थांसमवेत चर्चा करण्यात आली. यावेळी महेश शिंदे, मनोज शिंदे, प्रिया शिंदे, वैशाली शिंदे, आरती शिंदे, सतीश सावंत, स्वप्निल शिंदे, श्रीकांत चांदे, शाकिरा लोकरे, सुप्रिया शिंदे, सारिका शिंदे, साईनाथ कपडेकर, भारती सागवकर व ग्रामस्थ उपस्थित होते. विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री किर, मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट, वनपाल (चिपळूण) दौलत भोसले, वनरक्षक (रामपूर) राजाराम शिंदे, राहल गुंठे (कोळकेवाडी) यांनी मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow