खेड : दोरीने बांधून एकाला जबर मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Aug 22, 2024 - 14:55
 0
खेड : दोरीने बांधून एकाला जबर मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

खेड : तालुक्यातील मौजे काडवली गजवाडी येथे दि. १९ रोजी सायंकाळी ६.३० वा. चे सुमारास तीन जणांनी एकाला दोरीने बांधून लाकडी बॅटने जबर मारहाण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तीन संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दीपक लक्ष्मण वारणकर, रामचंद्र सखाराम वारणकर, स्वाती दीपक वारणकर (सर्व रा. काडवली गजवाडी ता. खेड जि. रत्नागिरी) यांच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:24 22-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow