रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांकडून एसटीला १२१ कोटी रुपयांची ओवाळणी

Aug 22, 2024 - 14:59
 0
रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांकडून एसटीला १२१ कोटी रुपयांची ओवाळणी

मुंबई : रक्षाबंधन आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे १७ ते २० ऑगस्टदरम्यान अनेक प्रवासी भटकंतीवर होते. या काळात अनेकांनी एसटीने प्रवास केला असून, याद्वारे एसटी महामंडळाला १२१ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

२० ऑगस्टला एका दिवशी ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले असून, यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. एसटीला दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळते. कारण या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे असा मोठा प्रवासी वर्ग एसटीमधून प्रवास करतो. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची गर्दी झाली होती. रक्षाबंधन दिवशी म्हणजे सोमवारी ३० कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी ३५ कोटी रुपये उत्पन्न एसटीला मिळाले. दोन दिवसांत १ कोटी ६ लाख प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केला. त्यात महिला प्रवाशांची संख्या ५० लाख आहे.

रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एसटी महामंडळाचे मा.उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी आभार मानले आहेत. तसेच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करुन विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:28 22-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow