गुहागर : आबलोलीतील महावितरणचे कनिष्ठ अभियंता 'नॉट रिचेबल'

Jul 30, 2024 - 10:38
 0
गुहागर : आबलोलीतील महावितरणचे कनिष्ठ अभियंता 'नॉट रिचेबल'

गुहागर : मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे वारवार खंडीत होणारा वीजपुरवठा यामुळे जनता त्रस्त असताना महावितरण शाखा कार्यालय आबलोलीचे कनिष्ठ अभियंता निकम हे 'नॉट रिचेबल' आहेत. यामुळे वीज ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे. पावसाच्या दिवसांत वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी कार्यालयात फोन केल्यावर प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे याची दखल घेत भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, गुहागर तालुका भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष साईनाथ कळझुणकर यांनी महावितरणचे गुहागर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. सूद यांची भेट घेऊन महावितरण कनिष्ठ अभियंता निकम यांच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक बदल करावा, असे सूचित केले.

शाखा अभियंत्यांना महावितरण विभागाकडून जनतेच्या सेवेकरता, संपर्काकरता, समन्वयाकरता एक मोबाईल नंबर दिलेला आहे. मात्र, निकम हे आबलोली कार्यालयात हजर झाल्यापासून या महावितरणच्या मोबाईल नंबरवर कोणी फोन केल्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही, अशी ग्राहकांची तक्रार आहे. कनिष्ठ अभियंता आणि प्रत्येक सजेसाठी नेमले गेलेले कर्मचारी हे त्या-त्या सजेवर राहत नसल्यामुळे अडचणी अधिक वाढत असल्याचे वीज ग्राहकांमधून बोलले जात आहे. ३३ केव्ही. 

पावसाळी हंगामात ११ केव्ही या प्रमुख वीजवाहिन्यांबरोबर गावात वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये बिधाड होत असतो. कर्मचारी वर्ग अपुरा पडत असल्याने वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत आहे. या संदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे खंडित होणारा वीजपुरवठा लक्षात घेता या आबोलीला महावितरण शाखा कार्यालयात असणारे कर्मचारी हा वीजपुरवठा सुरळीत करण्यास अपुरे पडत आहेत.

त्यामुळे उर्वरित पावसाळी हंगामासाठी कंत्राटी पद्धतीने अधिकचे कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता निकम यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना त्यांना नेमून दिलेल्या सजामधे किंवा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रमध्ये निवासी राहावे, अशा मागणीचे निवेदन उपकार्यकारी अभियंता, उपविभाग गुहागर यांना देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow