मुस्लिम समाजाची पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक; रामगिरी महाराजांविरोधात रत्नागिरीत गुन्हा दाखल

Aug 23, 2024 - 10:38
Aug 23, 2024 - 10:41
 0
मुस्लिम समाजाची पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक; रामगिरी महाराजांविरोधात रत्नागिरीत गुन्हा दाखल

रत्नागिरी : राजेश राणे उर्फ रामगिरी महाराज यांनी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या अत्यंत हिन विधानाविरुद्ध येथील मुस्लिम समाज आक्रमक झाला. त्यांनी गुरुवारी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर जमावाने ते धडकले. पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन आपल्या तीव्र भावाना व्यक्त केल्या. त्यानंतर संबंधिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

इस्लाम धर्मामध्ये प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांना मानाचे स्थान आहे. या महनिय व्यक्तीबाबत राजेश राणे उर्फ रामगिरी महाराज यांनी अतिशय हिन विधान केले. त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यावर भाष्य केल्याबद्दल मुस्लिम समाजामध्ये प्रचंड संतापाची भावना होती. रामगिरी महाराजाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र येऊन ते जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकले. यावेळी अधीक्षक धनंजय कुलकण यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच आपल्या भावानाही व्यक्त केल्या. पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी देखील येथील सलोख्याचे, एकोप्याच्या वातावरणाबाबत मुस्लिम समाजाचे कौतुक केले.

याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुस्लिम समाजाचे एक शिष्टमंडळ शहर पोलिस ठाण्यात जाऊन महाराजाविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी नौसीन अहमद काझी, बशिर मुर्तुझा, सुहेल मुकादम, अलिमियाँ काझी, जकी हिमायत खान, फरहान रशीद मुल्ला, सोहेल अब्दुल लतीफ साखरकर, इलियाज कादर खोपेकर, सिकंदर मुजावर, मन्सुर झारी, नदीम सोलकर, आतीफ साखरकर, अश्फाक अब्दुल्ला झारी, बजाज झारी, उबेद होडेकर, फैय्याज मुजावर आदी उपस्थित होते.

इस्लाम धर्मांमध्ये प्रेषित हजरत मोहम्मद मानाचे स्थान आहे. त्यांच्या विरुद्ध रामगिरी महाराजाने हिन व्यक्तव्य केले. त्यांच्या वैयक्तीक आयुष्यावर अत्यंत दुषित वक्तव्य केल्यामुळे भारतातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये सर्व समाजाचे प्रमुख मंडळी जमा झाली. संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून निवेदन दिले. आम्हाला यामध्ये साक्षिदार करून घ्या, अशी विनंती केल्याची माहिती मुस्लिम नेते बशिर मुर्तुझा यांनी दिली.
 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow