दापोली बाजारपेठ मधील व्यापारी कोणत्याही बंद मध्ये सहभागी होणार नाहीत

Aug 23, 2024 - 17:07
 0
दापोली बाजारपेठ मधील व्यापारी कोणत्याही बंद मध्ये सहभागी होणार नाहीत

दापोली : दापोली व्यापारी महासंघटना कोणत्याही राजकीय वा इतर संस्थांनी पुकारलेल्या बंद मध्ये सहभागी होणार नाही. दापोली व्यापारी महासंघटनेचा ठाम निर्णयाचे निवेदन दापोली तहसीलदार व पोलीस निरीक्षक दापोली यांना आज देण्यात आले. या प्रसंगी दापोली व्यापारी महासंघटनेचे प्रमुख दिनेश नायक, दिनेश जैन, राजेंद्र पेठकर, माणिक दाभोळे, युवराज पेठे, महेश जैन, रामभाऊ मेहता, स्वप्निल खेडेकर, किशोर बोधे व इतर व्यापारी हजर होते.

     
या पार्श्वभूमीवर वारंवार होणारे बंद हे उद्योग व्यवस्थापनाला हानीकारक असल्याचे मतैक्य दापोली बाजारपेठ मधील व्यापा-यांचे झाले. त्यानुसार कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संस्था यानी पुकारलेल्या बंद मध्ये यापुढे दापोली तालुक्यातील व्यापारी सहभागी होणार नाहीत, अशा आशयाचे पत्र दापोली पोलीस निरीक्षक व दापोली तहसीलदार यांना दापोली व्यापारी संघटनेने दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:36 23-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow