Rain Alert : राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा

Aug 24, 2024 - 09:45
Aug 24, 2024 - 09:50
 0
Rain Alert : राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : राज्यात शनिवार ते मंगळवार या चार दिवसांत मान्सून जोरदार सक्रिय होत असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

पुणे, मुंबई, पालघरसह १३ जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट, तर २८ जिल्ह्यांना मुसळधारेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने सक्रिय झाले आहेत. त्यामुळे शनिवार, दि. २४ ते मंगळवार, दि. २७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात मान्सून जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या बारा ते तेरा जिल्ह्यांना ६० ते १०० मि.मी., तर उर्वरित २८ जिल्ह्यांत २० ते ६४ मि.मी. इतका पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

ऑरेंज अलर्ट : (कंसात तारखा)

पालघर (२४, २५), ठाणे (२४ ते २६), मुंबई (२४), रायगड (२४ ते २६), रत्नागिरी (२४ते २६), सिंधुदुर्ग (२४, २५), पुणे (२४ ते २६), सातारा (२४, २५), अमरावती (२४), भंडारा (२४), चंद्रपूर (२४), गोंदिया (२४).

यलो अलर्ट : (कंसात तारखा)

पालघर (२६), मुंबई (२५ ते २६), रायगड (२५ ते २७), रत्नागिरी (२७), सिंधुदुर्ग (२४ ते २६), धुळे (२४, २५), नंदुरबार (२४ ते २६), जळगाव (२४), नाशिक (२४ ते २६), पुणे (२७), कोल्हापूर (२४ ते २७), सातारा (२६, २७), छत्रपती संभाजीनगर (२४, २५), जालना (२४, २५), परभणी (२४), हिंगोली (२५, २६), नांदेड (२४), अकोला (२४ ते २७), अमरावती (२४ ते २७), भंडारा (२४, २५), बुलडाणा (२५ ते २७), गडचिरोली (२४, २५), गोंदिया (२५), नागपूर (२५), वर्धा (२४, २५), वाशिम (२४ ते २७), यवतमाळ (२४ ते २७).

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 24-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow