मंडणगड बसस्थानकातील स्वच्छतागृहाला दुर्गंधीचे ग्रहण

Aug 24, 2024 - 12:18
Aug 24, 2024 - 12:29
 0
मंडणगड बसस्थानकातील स्वच्छतागृहाला दुर्गंधीचे ग्रहण

मंडणगड : मंडणगड बसस्थानकाला लागलेले दुर्गंधीचे ग्रहण काही सुटेना. दुर्गंधीयुक्त अस्वच्छ स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, पायाभूत सुविधांची वानवा यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून प्रवाशांना अपेक्षित सेवा न देणाऱ्या एसटी प्रशासनाच्या नावाने खडे फोडले जात आहेत.

तालुक्याचे प्रमुख ठिकाण असणाऱ्या मंडणगड शहर परिसरात केवळ एकच सार्वजनिक स्वच्छतागृह असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, तालुक्याच्या ठिकाणी दररोज कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. या गंभीर समस्येसंदर्भात नगरपंचायतही लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. मंडणगड शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. शहर परिसरात सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, आरोग्य व अन्य सुविधा उपलब्ध असल्यामुळे नेहमीच नागरिकांची व विद्यार्थ्यांची वर्दळ असते. शहरामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय असणे गरजेचे बनले आहे. मंडणगड बसस्थानक वगळता अशी सेवा अन्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध नाही. त्यातच स्थानक परिसरातील स्वच्छतागृहाजवळ सांडपाणी साचून दुर्गंधीचे साम्राज्य पसरते. त्यामुळे प्रवासी, नागरिकांची मोठी गैरसोय होते. बसस्थानक एका बाजूला आणि शासकीय कार्यालये एका बाजूला असल्याने धावाधाव करावी लागत असल्याची खंत तालुकावासियांनी व्यक्त केली आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी भविष्यात सार्वजनिक मुताऱ्यांची व शौचालयांची गरज भासणार आहे. याबाबत योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक असून सोयीसुविधांनी परिपूर्ण असे प्रसाधनगृह उभारण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

नसल्याने रात्रीची गैरसोय
बसस्थानकात रात्रीच्यावेळी दापोली, आंजर्ले, आंबडवे, नालासोपारा, मुंबई, परळ, बोरिवली, ठाणे मार्गावरील मोठ्या प्रमाणात एसटी येतात; मात्र स्वच्छतागृहात वीज नसल्याने काळोखात प्रवाशांना जावे लागत आहे. यात महिलावर्ग व वृद्ध नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow