रत्नागिरी : मंकीपॉक्सबाबत जि.प. आरोग्य विभाग 'अलर्ट' मोडवर

Aug 24, 2024 - 15:27
Aug 24, 2024 - 15:30
 0
रत्नागिरी : मंकीपॉक्सबाबत जि.प. आरोग्य विभाग 'अलर्ट' मोडवर

रत्नागिरी : सध्या देशात नसला, तरी जगातील विविध देशात मंकीपॉक्स या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. स्वीडन व पाकिस्तान या देशांनी मंकीपॉक्स बाधित रुग्ण नोंदवले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभाग मात्र सतर्क झाला आहे. 

मंकीपॉक्स बाबत नागरिकांनी घाबरून जावू नये. मंकीपॉक्स हा आजार आपल्या देशात किंवा राज्यात आत्तापर्यंत आलेला नाही. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना याबाबत वरिष्ठ स्तरावरून प्राप्त मार्गदर्शनपर सूचना दिलेल्या आहेत. परंतु, खबरदारी म्हणून नागरिकांनी मंकीपॉक्स या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून परत आलेल्या प्रवासी नागरिकांना अशा प्रकारची काही लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

काय आहे मंकीपॉक्स आजार? मंकीपॉक्स का आजार एका प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरामध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैसर्गिक स्रोत आहेत.

या आजाराचा अधिशयन कालावधी हा ६ ते १३ दिवस तथापि ५ ते २१ दिवसांपर्यंत असू शकतो, तर रुग्णाचा संसर्गजन्य कालावधी हा अंगावर पुरळ उभठण्यापूर्वी १ ते २ दिवसापासून ते त्वचेवरील फोडावरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्ण पणे मावळेपर्यंत, (बाधित व्यक्ती इतर व्यक्तीसाठी संसर्गजन्य असतो).

उपाययोजना
संशयित मंकीपॉक्स रुग्णाला वेळीच विलगीकरण करावे,
रुग्णाच्या कपडयांची अथवा अंथरूण
पांघरुणाची संपर्क येऊ न देणे.
हाताची स्वच्छता ठेवणे.
रुग्णांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर
करणे.
 
लक्षणे
लसिका ग्रंथीला सूज (कानामागील तसेच
काखेतील लसिका ग्रंथीना सूज येणे),
डोकेदुखी, अंगदुखी, घाम येणे, घसा खवखवणे, खोकला येणे.
कुपोषण, कृमी प्रादुर्भाव आणि कमी रोग
प्रतिकारशक्ती असलेल्याना हा आजार गंभीर
स्वरूप धारण करू शकतो.
- मंकीपॉक्स सदृश आजार :- कांजण्या, नागीन, गोवर, सिफिलीस, हँड फुट माउथ डिसीज इत्यादी.

प्रसार कसा होतो ?
थेट शारीरिक संपर्क, शरीरद्रव्य, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्राव तसेच खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला, तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबाद्वारे होऊ शकतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow