राजापूर तालुका व्यापारी संघाकडून बदलापूर घटनेचा निषेध

Aug 24, 2024 - 16:35
 0
राजापूर तालुका व्यापारी संघाकडून बदलापूर घटनेचा निषेध

राजापूर : बदलापूर येथील घटनेचा निषेध म्हणून राजापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आहे. या घटनेसह देशात घडणाऱ्या महिला अत्याचारातील घटनांमधील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. यासाठी व्यापारी संघाने पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांना निवेदन दिले आहे.

निवेदनाची प्रत राजापूरच्या तहसीलदारांनाही देण्यात आली आहे.

बदलापूर, महाराष्ट्र राज्यासह देशात अनेक ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या सर्व घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असून त्या सर्व घटनांचा आम्ही व्यापारी जाहीर निषेध करत आहोत. या सर्व घटनांमधील सर्व आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोरात कठोर शासन करावे, अशी मागणी राजापूर तालुका व्यापारी संघाने निवेदनाद्वारे केली आहे.

महाविकास आघाडीने बदलापूरच्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बंदमध्ये सहभागी न होता. काळ्या फिती लावून दुकाने उघडण्याचे आवाहन राजापूर तालुका व्यापारी संघाने केले होते. मात्र उच्च न्यायालयाने याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर हा बंद मागे घेण्यात आला आहे. मात्र व्यापारी संघाने आज राजापूर बाजारपेठेत बदलापूर घटनेचा निषेध आपल्या दुकानांमधील कामगारांसह काळ्या फिती लावून व्यक्त केला आहे. निवेदनाच्या प्रती तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या.यावेळी राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, खजिनदार दीनानाथ कोळवणकर, प्रकाश कातकर, विनोद पवार, विनय गादीकर, माजी नगरसेवक अभय मेळेकर, राजापूर अर्बन बॅंकेचे उपाध्यक्ष विवेक गादीकर, संदेश टिळेकर, गणेश नार्वेकर आदी व्यापारी उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:04 24-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow