रत्नागिरी : आंबेशेत-जिल्हा रुग्णालय रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी

Aug 27, 2024 - 10:27
 0
रत्नागिरी : आंबेशेत-जिल्हा रुग्णालय रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी

रत्नागिरी : शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय ते आंबेशेत दरम्यान रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. कर्ला, आंबेशत येथील घरगुती गणपतींची प्रसिद्ध मिरवणूक याच रस्त्यावरुन जात असल्याने, रस्त्याची तातडीने डागडुजी करावी, अशो मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

कर्ले, आंबेशेत, जुवे या भागातील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागत असून, येथील आम्रपाली बिल्डींग, निवखोल घाटी, निवखोल, राजिवडा, कर्ला मारुतीमंदिर ते आंबेशेत या भागातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. बारीक खड्डे व त्यातील खडीमुळे दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. बुजवले जाणारे खड्डे पुन्हापुन्हा पडत आहेत.

पुढील पंधरा दिवसात गणेशोत्सव आला असून, कर्ला, आंबेशेत गावची प्रसिद्ध गणपती मिरवणूक याच रोडवरुन जात असते. सुमारे साडेतीनशेहून अधिक गणपती या आगमन मिरवणुकीत सहभागी असतात. त्यामुळे या रस्त्याची चांगल्या प्रतिची डागडुजी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या भागातील प्रभागासाठी अंदाजे १ कोटी ९० लाखांचा निधी देण्यात आला असून, त्याचा सुयोग्य वापर करावा, असेही ग्रामस्थांचे मत आहे.

याबाबत मिलिंद सुर्वे, प्रदीप वायंगणकर, रमेश नागवेकर, उमेश वायंगणकर, सुबोध चव्हाण, शेखर घोसाळे, संतोष घोसाळे यांच्यासह ग्रामस्थांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 27/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow