खेड : भरणे येथे पुस्तकांची अनोखी दहीहंडी

Aug 29, 2024 - 12:19
Aug 29, 2024 - 14:28
 0
खेड : भरणे येथे पुस्तकांची अनोखी दहीहंडी

खेड : ओम साई मित्र मंडळ भरणे आणि वंदे मातरम् संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यामाने पुस्तक दहीहंडी लावण्यात आलेली होती. ही पुस्तकांची दहीहंडी देवी काळकाई गोविंदा पथक भरणे यांनी फोडली. पुस्तक दहीहंडी फोडल्यानंतर पुस्तके बालगोपाळ आणि प्रेक्षकांना वाटण्यात आले.

अमित कदम आणि राजेश मोरे यांनी स्थापन केलेल्या ओम साई मित्र मंडळ हे गेली एकवीस वर्षे भरणे नाका येथे भरत फागे यांच्या सहकायनि दहीहंडी उत्सव साजरा करीत आहे. या मंडळाचे कै. संदीप दिवेकर, कै. सचिन सुर्वे, महेंद्र मोरे, चंदन शिरगावकर, दीपक फागे यांनी अध्यक्ष मागून काम पाहिले होते. विराज मोरे अध्यक्ष, मोहम्मद सामी सेक्रेटरी, सुयोग पांचाळ खजिनदार आणि संपूर्ण कार्यकारिणी आणि सदस्य यांनी ही अनोखी दहीहंडी अत्सव साजरा करण्यासाठी मेहनत घेतली.

वंदे मातरम् संघटना महाराष्ट्र ही संघटना मुख्यत्वे पुणे येथे स्पर्धा परीक्षेसाठी राज्यभरातून आलेल्या विद्याध्यासाठी कार्य करीत असते. या संघटनेचे स्वप्निल बैंकर यांच्या माध्यमातून ही पुस्तकं दहीहंडी साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला. पुणे येथे संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक गरीब व होतकरू तरुण स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी येतात यासाठी त्यांना हॉस्टेलची सोय करण्याचा प्रयत्न वंदे मातरम् संघटना महाष्ट्र यांच्यामार्फत होणार आहे.

वंदे मातरम् संघटना आणि ओम साई मित्र मंडळ यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील गरजू विद्याध्याना पुस्तक आणि शालेय साहित्याचे वाटप होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 29/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow