"कांचन डिजिटल गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धा" निकाल जाहीर

Sep 10, 2024 - 10:39
 0
"कांचन डिजिटल गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धा" निकाल जाहीर

◼️ रत्नागिरीसह लांजा, राजापूर, संगमेश्वर-देवरुख तालुक्यांचे निकाल जाहीर

◼️ अध्यात्मिक-पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांसह सामाजिक देखावे साकारण्यावर भर

◼️ कांचन मालगुंडकर व उद्योजक भैय्याशेठ तथा किरण सामंत यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या "कांचन डिजिटल"तर्फे आयोजित, तसेच प्रख्यात उद्योजक भैय्याशेठ तथा किरण सामंत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही तालुकास्तरीय भव्य "कांचन डिजिटल गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धा" आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे यंदा 5 वे वर्ष असल्यामुळे यंदा स्पर्धेचा इतर 4 तालुक्यांत विस्तार करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण पूर्ण झाले असून रत्नागिरीसह लांजा, राजापूर, संगमेश्वर-देवरुख तालुक्यांचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

या स्पर्धेचे परीक्षण रत्नागिरी तालुक्यासाठी कांचन मालगुंडकर, अभिजीत नांदगावकर, नरेंद्र पाटील सर, विजय पाडावे, विजय बासुतकर, अजिंक्य सनगरे, श्रावणी मालगुंडकर, मंथन मालगुंडकर, सलोनी मालगुंडकर, शकील गवाणकर यांनी केले. तर राजापूर तालुक्यासाठी चारुदत्त नाखरे, कलीम मुल्ला, लांजा तालुक्यासाठी अपर्णा हळदणकर व सहकारी, तसेच देवरुख-संगमेश्वर बाळकृष्ण चव्हाण व सहकाऱ्यांनी केले.

गणेशोत्सव कालावधितच त्वरित परीक्षण व निकाल हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. यंदाही स्पर्धेला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला. गणेशभक्तानी अत्यंत कलात्मक, कल्पकतेने विविध देखावे, आकर्षक आरास साकारल्या होत्या. विशेष म्हणजे यंदा अध्यात्मिक-पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांसह सामाजिक देखावे साकारण्यावर भर देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. "स्त्रीवरील अत्याचार, प्लास्टिक दुष्परिणाम, प्रदूषण, सरकारी शाळांचे महत्व" आदी सामाजिक विषय मांडून याबाबत समाजात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले. हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजक कांचन मालगुंडकर यांनी यानिमित्ताने नमूद केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :-

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow