' मी 1 सप्टेंबरला राजकोट किल्ल्यावर जाणार, देवेंद्र फडणवीस मला अडवणार आहेत का?' : मनोज जरांगे

Aug 29, 2024 - 14:51
 0
' मी 1 सप्टेंबरला राजकोट किल्ल्यावर जाणार, देवेंद्र फडणवीस मला अडवणार आहेत का?' : मनोज जरांगे

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. पुतळा कोसळल्यानंतर अनेक नेत्यांनी राजकोटला भेटीही दिल्या. आता मी १ सप्टेंबरला राजकोट किल्ल्यावर जोणार आहे, देवेंद्र फडणवीस मला अडवणार आहेत का?असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दंड थोपटले आहेत.

जालन्यातून ते माध्यमांशी बोलत होते.

मनोज जरांगे पाटील हे 1 सप्टेबरला राजकोट किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत कुणीही राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

राजकोट किल्ल्यावर जायला देवेंद्र फडणवीस अडवणार आहेत का?

राजकोटवर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने सर्व जनतेच्या भावना दुखावल्या असून त्या ठिकाणी जाऊन मी पहाणी करणार आहे. असे जरांगे म्हणालेत. राजकोट किल्ल्यावर जायला देवेंद्र फडणवीस अडवणार आहेत का? असा सवाल करत राजकारणासाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करु नका, उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे असं म्हणत हे काम करणाऱ्याला शोधून जेलमध्ये टाकलं पाहिले असं म्हणत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरल्याचं दिसून आलं.

मिस्त्रीला तुरुंगात टाका, कोणत्याही महापुरषाचं काम...

उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे, ज्यानी काम निट केलं नाही त्याला शोधून काढलं पाहिजे. त्याला आधी जेलमध्ये टाका. कोणत्याही महापुरुषाचं बांधकाम नीटच केलं पाहिजे. असं जरांगे म्हणालेत. आम्ही तिथे जाऊन पहाणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते संवेदनशील ठिकाण आहे का ?ती बॉण्ड्री आहे का भारत पाकिस्तानची? उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष काम करणारा नीट नसल्यावर... तो मिस्त्री शोधून काढला पाहिजे, त्याला मध्ये टाकले पाहिजे. 1 तारखेला जाणार आहे, ते 600 किमी अंतर आहे. असंही ते म्हणाले.

"फडणवीस चालता चालता फसवतो..'' मनोज जरांगे

.राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघातप्रकरणी जालन्यातून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा टीकेची झोड उठवली असून आम्ही राजकोटला जाणार असून देवेंद्र फडणवीस रोखणार आहेत का? असा सवाल त्यांनी केलाय. आरक्षणाचा गनिमीकावा ओळखू देणार नाही असं सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस प्रत्येक वेळी डाव टाकतात, चालताचालता फसवतात असा आरोप त्यांनी केलाय. ज्या छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मोदी साहेब महाराष्ट्रातून गेले होते त्या शिवरायांचे स्मारक अरबी समुद्रात झालेलं नाही, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधल्याचे दिसले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:20 29-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow