खेड : भरणेनाका येथील गांजाप्रकरणी तिघांना पोलिस कोठडी

Aug 29, 2024 - 14:57
 0
खेड : भरणेनाका येथील गांजाप्रकरणी तिघांना  पोलिस कोठडी

खेड : मुंबई- गोवा भरणेनाका येथे सोमवारी रात्री २२ किलो गांजा जप्त करून अटक केलेल्या तीन संशयित आरोपीना पोलिसांनी काल रात्री उशिरा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या तिघाना २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. रत्नागिरी जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस पथकाने सोमवारी (ता. २६) सा रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर भरणेनाका येथे एका चारचाकी गाडीची झडती घेऊन सुमारे  ४ लाख ४२ हजार १८० रुपये किमतीचा २२ किलो गांजा चारचाकी गाडीसह सुमारे १० लाख बार ३८० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या प्रकरणी येथील पोलिसांनी

मंडणगड शहरातील उदयसिंह मदनसिंह चुडावत (३०, रा. पाटरोड, आदर्शनगर, मंडणगड) विशाल विद्याधर कोकाटे, (३४.ग. पोस्ट ऑफिस बिल्डिंग, मंडणगड सिद्धेश उदय गुजर (३२, रा. पाठरोड, आदर्शनगर, मंडणगड) या ती संशयितांना अटक केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:25 PM 29/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow