IPL 2025 : रोहित शर्मावर लखनौ ५० कोटींची बोली लावणार?
मागील आयपीएल हंगामात रोहित शर्मा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. रोहितला वगळून मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने हार्दिक पांड्याला आपल्या संघाचे कर्णधार बनवले.
रोहितबद्दल सुरू असलेल्या चर्चेला लखनौच्या फ्रँचायझीचे मालक संजीव गोएंका यांनी पूर्णविराम दिला. संजीव गोएंका यांना विचारण्यात आले की, लखनौने रोहित शर्मासाठी ५० कोटी रुपये बाजूला ठेवले असल्याची चर्चा आहे. याबद्दल ते म्हणाले की, मला एक सांगा की, मला किंवा तुम्हाला कोणालाच माहिती नाही की रोहित शर्मा लिलावात येणार आहे की नाही. या केवळ अफवा आहेत. मुंबई इंडियन्स रोहितला रिलीज करणार की नाही, तो लिलावात येणार की नाही... तो लिलावात जरी आला तरी तुमच्या पर्समधील ५० टक्के रक्कम एका खेळाडूसाठी वापरणार आहात, मग उरलेल्या २२ खेळाडूंना तुम्ही कसे सांभाळणार? असा प्रश्न उद्भवतो. गोएंका यांनी स्पोर्ट्स तकशी बोलताना या चर्चांना पूर्णविराम दिला.
रोहित शर्माला आपल्या संघात घेण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का? या प्रश्नावर गोएंका यांनी सावध प्रतिक्रिया दिली. रोहितला आपल्या संघात घेण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील. एक चांगला खेळाडू, चांगला कर्णधार आपल्या संघात असावा असे सर्वांना वाटते. हे इच्छेबद्दल नाही. आपल्याकडे काय आहे आणि काय उपलब्ध आहे. आपण त्याचे काय करू शकता हे महत्त्वाचे असते. माझी इच्छा काहीही असू शकते आणि हे सर्व फ्रँचायझींना लागू होते. पण, ते सर्वांना मिळत नाही, असे गोएंका यांनी मिश्किलपणे म्हटले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:33 29-08-2024
What's Your Reaction?