काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही : रमेश चेन्निथला

Aug 30, 2024 - 10:17
 0
काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही : रमेश चेन्निथला

नागपूर : विधानसभा निवडणुकीनंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. काँग्रेस पक्षातील कुणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट केले.

मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात 'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, आपला त्याला पाठिंबा राहील', असे वक्तव्य केले होते. शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनीही 'उद्धव ठाकरे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे' असे वक्तव्य बरेचदा केले आहे. या पार्श्वभूमीवर चेन्निथला यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

काँग्रेसने काल नागपूरमध्ये बदलापूरच्या घटनेचा निषेध आणि विधानसभेच्या निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. चेन्निथला यांनी या आंदोलनाला भेट दिली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदावरून मविआमध्ये मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "आम्ही आघाडीचा धर्म पाळू, मविआ एकत्र निवडणूक लढेल. जागा वाटपाबाबत लवकरच पुन्हा एक बैठक होणार आहे. त्यात आम्ही जागा वाटपाचे धोरण निश्चित करणार आहोत", असे चेन्निथला म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकता येथील अत्याचाराच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील बदलापूर येथे घडलेल्या घटनेवरही त्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे. त्या देशाच्या राष्ट्रपती आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 30/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow