आंगवली मार्लेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न

Jul 22, 2024 - 15:15
 0
आंगवली मार्लेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न

देवरुख : देवरुख मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या मंदिरात चोरीचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांचा हाती काहीच लागले नाही. यातील चोरटा सीसटीव्हीत कैद झाला आहे. 

जानेवारी महिन्यात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजता चोरीचा प्रयत्न होणारी घटना घडली. शनिवारी सकाळी पुजारी पूजेसाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सभागृह व मंदिराचा मुख्य दरवाजा चोरट्याने फोडला. याचबरोबर कपाटाचा दरवाजाही तोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, चोरी करण्यात अपयश ठरला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या पूर्वी या मंदिरात चोरीची घडली होती. गाव मंदिरातही चोरी होती. सह्याद्रीच्या कडेकपारित वसलेल्या श्री देव मार्लेश्वर तीर्थक्षेत्र येथे आंगवलीचा श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरिजा देवीचा विवाह सोहळा मकर संक्रांतीला संपन्न होतो. मार्लेश्वर देवाचे विवाहपूर्वीचे सर्व विधी याच मंदिरात पार पाडतात. मार्लेश्वर देवाची पालखी याच मंदिरातून मार्लेश्वर तीर्थक्षेत्र येथे रवाना होत असते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:28 22-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow