नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू

Jun 11, 2024 - 14:55
 0
नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू

◼️ पहिली मेरिट लिस्ट १५ जून रोजी होणार जाहीर 

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स, एमआयडीसी, रत्नागिरी येथे अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया १४ जूनपर्यंत सुरू राहणार असून, पहिली मेरिट लिस्ट १५ जून रोजी जाहीर केली जाणार आहे. 

दिनांक ११ जून ते १४ जून या कालावधीत प्रवेश अर्ज देणे व स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर १५ जून रोजी पहिली मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार आहे. १८ जून ते २५ जूनदरम्यान पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश दिले जाणार आहेत, तर २१ जूनपासून प्रतीक्षा यादीतील (वेटिंग लिस्ट) विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. फ्री वायफाय भव्य कॅम्पस, दर्जेदार भौतिक सुविधा,उच्चशिक्षित प्राध्यापक  वर्ग, उत्कृष्ठ निकालांची परंपरा, नीट, जेईईई, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, एसी कॉम्पुटर लॅब्स, अद्ययावत प्रयोगशाळा, बाय फोकल विषयांची सुविधा आदी वैशिष्ट्यांसह हे महाविद्यालय गरीब होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे माहेरघर बनले आहे. 

आयटी, कॉम्प्युटर, मेकॅनिकल मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्ससाठी मर्यादित प्रवेश असून, यावर्षी विद्यार्थ्यांना ए.आय, व्हिडीओ एडिटिंग, ऍनिमेशनचे शॉर्ट कोर्सेस करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. 

अधिक माहितीसाठी ९४२०८४२७९९, ९४२३१८९७६१, ८८०६८४४५६९ येथे संपर्क साधावा व प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. आशा जगदाळे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:23 11-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow