Paris Paralympics 2024 : भारताचं पहिलं सुवर्णपदक; अवनी लेखराचा नेमबाजीत सुवर्णवेध; मोना अग्रवालची ब्राँझवर मोहोर

Aug 30, 2024 - 16:09
Aug 30, 2024 - 16:32
 0
Paris Paralympics 2024 : भारताचं पहिलं सुवर्णपदक; अवनी लेखराचा नेमबाजीत सुवर्णवेध; मोना अग्रवालची ब्राँझवर मोहोर

पॅरीस : पॅरीस ऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी डबल धमाका केलाय. भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने दिमाखदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत शुक्रवारी (दि.30) तिने दिमाखदार कामगिरी करत भारतासाठी गोल्ड मेडल मिळवलं आहे.

याच स्पर्धेत भारताच्या मोना अग्रवालने कांस्य पदक जिंकलं आहे. अवनी लेखरा आणि मोना अग्रवालच्या कामगिरीमुळे भारताचं ऑलम्पिकमध्ये पदकांचं खातं उघडलं आहे.

अवनीने फायनलमध्ये 249.7 गुण मिळवत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अवनीने टोक्यो ऑलम्पिक 2020 मध्ये याच स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले होते. दरम्यान, गोल्ड मेडल कायम राखण्यात तिला यश आलं आहे. दक्षिण कोरियाच्या ली युनरीने या स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावले आहे. याशिवाय अवनीने टोक्यो ऑलम्पिक 2020 मध्ये 50 रायफल थ्री स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:35 PM 30/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow