प्रवासी राजा दिन-कामगार पालक दिन: विभाग नियंत्रक १५ जुलैपासून आगारांना भेट देणार

Jul 10, 2024 - 11:00
Jul 10, 2024 - 16:54
 0
प्रवासी राजा दिन-कामगार पालक दिन: विभाग नियंत्रक १५ जुलैपासून आगारांना भेट देणार

रत्नागिरी : रा. प. महामंडळाने जाहीर केलेल्या प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्यासाठी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे १५ जुलैपासून १२ ऑगस्टपर्यंत सर्व आगारांना भेटी देणार आहेत. चिपळूण आगारात १५ जुलैला पहिला कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ते प्रवाशांच्या सूचना ऐकून घेणार आहेत. कामगार पालकदिनानिमित्त त्याच दिवशी विभाग नियंत्रक दुपारी ३ ते ५ या वेळेत कामगारांच्या तक्रारी जाणून घेणार आहेत.

रा. प. महामंडळ राज्यात दररोज सरासरी ५४ लाख प्रवाशांना प्रवासी सेवा देत आहे. त्यासाठी ९० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी अहोरात्र कर्तव्यावर आहेत रा. प. बसस्थानक, बसस्थानकांवर असणारी प्रसाधनगृह स्वच्छ, निर्जंतुक आणि टापटीप असावीत तसेच रा. प. बसेस स्वच्छ वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हावीत, ठरलेले थांबे घ्यावीत, चालकवाहक यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे, अशी किमान अपेक्षा प्रवाशाकडून व्यक्त केली जाते. त्या संबंधित प्रवासी तक्रारीचे निराकरण होण्यासाठी प्रवासी राजा दिन साजरा केला जाणार आहे.

रा. प. कर्मचारी कर्तव्यावर असताना विश्रांतीसाठी ज्या विश्रांतीगृहात थांबतात तेथील प्रसाधनगृहेदेखील स्वच्छ, निर्जंतुक, टापटीप असावीत तसेच त्यांच्या रजा, बदली अन्यायकार बेकायदेशीर शिक्षा कर्तव्याबाबत वेळापत्रकातील त्रुटी रा.प. बसेसविषयी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे ही आगार पातळीवर निराकरण करण्याकरिता कामगार दिन, रा. प. महामंडळाच्या आगारात साजरा करायचा आहे. त्याकरिता विभाग नियंत्रक बोरसे दौरा करणार आहेत.

प्रवासी राजा दिनाची सूचना प्रवासी संघटना, प्रवाशांना, सर्वसामान्य जनतेला कळण्यासाठी बसस्थानकावर व सूचनाफलकावर सूचना प्रसारीत करावी. यात तक्रारी लेखी निवेदनाद्वारे स्वीकारून त्यांची नोंद नोंदवहीत ठेवण्यात येणार आहे. तक्रारीची सुनावणी झाल्यानंतर तक्रारीचे स्वरूप व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभाग नियंत्रकाकडे पाठवण्याच्या सूचना आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत. संघटना व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बाबतीतील प्रश्न, तक्रारी लेखी स्वरूपात घेऊन त्याची नोंद केली जाईल. कार्यवाहीचा अहवाल विभाग नियंत्रकांना तत्काळ सदर करावा, अशा सूचना महामंडळाने जारी केल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:17 PM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow