गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रबंधक रवींद्र केतकर सेवानिवृत्त

Jun 5, 2024 - 10:31
Jun 5, 2024 - 10:34
 0
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रबंधक रवींद्र केतकर सेवानिवृत्त

रत्नागिरी : विद्यार्थीदशेपासूनच माझे या संस्थेशी ऋणानुबंध जुळले आहेत. संस्थेने सेवेची संधी दिली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी, प्राचार्य यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करतो. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांकडूनही आदर, प्रेम मिळाले. माझी पत्नी सायली केतकर हिने आणि माझ्या कुटुंबीयांनीही मोलाची साथ दिली, असे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रबंधक रवींद्र केतकर यांनी सेवानिवृत्तीपर सत्कार कार्यक्रमात केले.

केतकर आणि प्रयोगशाळा परिचर दीपक कुळ्ये हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृतीपर सदिच्छा समारंभ महाविद्यालयात नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रंसगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या हस्ते, महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते केतकर आणि  कुळ्ये यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, महेश सरदेसाई यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, दीपक कुळ्ये सपत्नीक उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नीलेश पाटील यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 05/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow