रत्नागिरीत आज जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सव

Sep 3, 2024 - 09:44
Sep 3, 2024 - 14:44
 0
रत्नागिरीत आज जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सव

रत्नागिरी : समग्र शिक्षा, शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषदतर्फे महावाचन उत्सव, जिल्हास्तरीय ग्रंथप्रदर्शन व महोत्सव ३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी ग्रामीण कथाकार व लेखक आप्पासाहेब खोत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम शहरातील लोकमान्य टिळक शासकीय ग्रंथालयात होणार आहे. सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी, विद्यार्थ्यांचे वाचन आदी कार्यक्रम होणार आहेत. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow