राजापुर आगारातील दोन कर्मचारी आंदोलनात; २६५ एसटी फेऱ्या सुरळीत

Sep 4, 2024 - 10:47
Sep 4, 2024 - 10:52
 0
राजापुर आगारातील दोन कर्मचारी आंदोलनात; २६५ एसटी फेऱ्या सुरळीत

राजापूर : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यस्तरीय धरणे आंदोलनाचा राजापूर तालुक्यातील एसटी प्रवासी वाहतुकीवर परिणाम झालेला नाही. ग्रामीण भागासह विविध भागांमध्ये धावणाऱ्या एसटीच्या २६५ नियमित फेऱ्या सुरळीत आहेत, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. राजापूर आगारातील अवघे दोन कर्मचारी सहभागी झाले होते.

गेल्या काही वर्षांमध्ये एसटो कर्मचारी अनेक महत्त्वांचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी कर्मचारी प्रयत्न करत होते; मात्र, त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. शासनासह महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी काळपासून राज्यभर कर्मचाऱ्यानी धरणे आंदोलन पुकारले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी होण्याची शक्यताही होती; मात्र, राजापूर एसटी आगारातील कर्मचारी संघटना आंदोलनात सहभागी झालेली नाही. त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झालेला नाही. या आंदोलनात आगारातील अवघे दोन कर्मचारी सहभागी झाले असून अन्य कर्मचारी, चालक-वाहक कार्यरत आहेत, असे आगार व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले. प्रवाशांना सुरळीत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथील आगारातून विविध भागात जाणाऱ्या २६५ फेल्या सुरू आहेत.

दरम्यान, गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपलेला असल्याने प्रवाशांचीही आगारामध्ये चांगलीच गर्दी होती.

मुंबईला आज २२ गाड्या सुटणार
चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी कोकणात येणार आहेत. चाकरमान्यांना मुंबईतून कोकणात यायचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून एसटी गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. आगारातून उद्या (ता. ४) २२ गाड्या मुंबईला जाणार आहेत. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठीही गाड्याही उपलब्ध करून देण्यात येणार असून, या फेऱ्यांचे नियोजन सुरू असल्याचेही आगार प्रशासनाकडून माहिती देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 04/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow