पाली पंचक्रोशी बौद्ध समाज मंडळाला दीक्षाभूमीसाठी पालकमंत्र्यांकडून सव्वा कोटीचा निधी

Sep 4, 2024 - 11:38
Sep 4, 2024 - 12:42
 0
पाली पंचक्रोशी बौद्ध समाज मंडळाला दीक्षाभूमीसाठी पालकमंत्र्यांकडून सव्वा कोटीचा निधी

रत्नागिरी : समाजकल्याण विभागाकडून पाली पंचक्रोशी बौद्ध समाज मंडळाला समाजमंदिर व दिक्षाभूमी बांधण्यासाठी तीन गुंठे जमिन मिळाली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी नाविण्यपूर्ण योजनेतून १ कोटी ३० लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

पाली पंचक्रोशी बौद्ध समाज मंडळाने समाजमंदिर आणि दिक्षाभूमीसाठी पाली ग्रामपंचायतीमार्फत समाजकल्याण विभागाला प्रस्ताव सादर केला होता. मंडळाच्या पाठपुराव्यानंतर जागा मिळाली. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी दिक्षाभूमी आणि समाज मंदिराच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला. पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मंडळातर्फे सभा आयोजित करण्यात आली. या सभेचे प्रास्ताविक निवृत्त तहसीलदार मारूती कांबळे यांनी केले. ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल सावंत यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषवले. निधी उपलब्ध करून देणाऱ्या पालकमंत्र्यांचा अभिनंदन ठराव करण्यात आला.

या सभेला उपस्थित असलेल्या बाबर सावंत, अनंत सावंत, सुनील कांबळे, सुधीर कांबळे, अमोल सावंत, वैभवी सावंत, चोरवणेचे सरपंच दिनेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 04/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow