संगमेश्वर : 'लाडकी बहीण' मोबाईल रेंजच्या प्रतीक्षेत...

Aug 5, 2024 - 11:27
Aug 5, 2024 - 15:47
 0
संगमेश्वर : 'लाडकी बहीण' मोबाईल रेंजच्या प्रतीक्षेत...

आरवली : माखजन-आरवली भागात गेल्या अनेक दिविसांपासून विस्कळीत असलेली इंटरनेट सेवा आणि मोबाईलला रेंज नसल्यामुळे बँक, शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयातील कामांचा खोळंबा झाला आहे. मोबाईलला रेंज नसल्याने त्याचा फटका लाडक्या बहिणीला बसत आहे.

गेल्या आठवडाभर कधी सुरू तर कधी बंद, अशा अवस्थेत असलेली मोबाईल व इंटरनेट सेवा गेले काही दिवस ठप्प आहे. त्यामुळे ऑनलाईन कामांचा खोळंबा झाला आहे. जबाबदार अधिकारी- कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे उघड झाले आहे. गत आठवडाभरापासून ही सेवा अधिकच त्रासदायक ठरू लागली आहे. नेटवर्कचा लपंडाव सुरू आहे. दोन-दोन तास इंटरनेट सेवा ठप्प पडत असल्याने अनेकांची कामे रेंगाळली आहेत.

इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन कामे केली जातात, मात्र ही सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना तासतास ताटकळत रहावे लागत आहे. परिणामी, अनेकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खंडित मोबाईल इंटरनेट सेवेचा फटका लाडक्या बहिणीला बसत आहे. इंटरनेट सेवा ठप्प होत असल्याने मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेचे अर्ज ऑनलाईन भरताना अडचणी निर्माण होत आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 05/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow