संगमेश्वर : माखजनच्या दोघींची राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

Sep 4, 2024 - 10:45
Sep 4, 2024 - 14:46
 0
संगमेश्वर : माखजनच्या दोघींची राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

आरवली : रत्नागिरी जिल्हा कनिष्ठ अॅथलेटिक्स असोसिएशन मार्फत जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा १ सप्टेंबरला डेरवण येथे झाल्या. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून ४५० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. रेस वॉक या खेळात माखजन हायस्कूलच्या सिमरन पवार हिने प्रथम क्रमांक व थाळीफेक मध्ये मीनल जोगले हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. या खेळाडूंची निवड पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ३८ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय कनिष्ठ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झाली आहे. यशस्वी खेळाडू व क्रीडा शिक्षक निखिल वारके यांचे डॉ. दत्तात्रय बापट व मुख्याध्यापिका रुही पाटणकर यांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 04/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow