रत्नागिरी : मातृत्व लादणाऱ्या आरोपीस न्यायालयीन कोठडी

Aug 13, 2024 - 11:18
 0
रत्नागिरी : मातृत्व लादणाऱ्या आरोपीस न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून मातृत्व लादणाऱ्या आरोपी मोहसीन शेख याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गेल्या गुरुवारी त्याला अटक करण्यात आली होती. यापूर्वी त्याच्यावर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. 

हा आरोपी प्रत्येकवेळी ज्या ठिकाणी राहात नाही तेथील पत्ता पोलिसांना देतो. पोलिसही कोणतीही खात्री न करता चर्चरोड या पत्त्यावरच त्याची नोंद करून घेतात. लग्नाचे आमिष दाखवून मातृत्व लादणाऱ्या आरोपी मोहसीन शेखने पहिले लग्न झाले नसल्याचे भासवत दुसऱ्या तरुणीला जाळ्यात ओढले. सन २०२१ ते २०२४ पर्यंत त्याने पीडित तरुणीवर अत्याचार केले. त्याचे लग्न झाल्याचे समजल्यानंतर गेल्या गुरुवारी पीडित तरुणीने शहर पोलिसांकडे तक्रार केली.

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, शहर पोलिसांनी आरोपीला अटक करून शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले. यावेळी आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या आरोपीवर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गुन्ह्यांसह अत्याचार प्रकरणी अटक केल्यानंतर पुन्हा एकदा त्याने चर्चरोड असा पत्ता दिला आहे. पोलिसांनीही कोणतीही खात्री न करता पत्ता नोंदवून घेतला आहे. प्रत्यक्षात हा आरोपी काही वर्षांपूर्वी येथे राहात होता. परंतु, आता तो चर्चरोड पत्त्यावर राहात नाही.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 13-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow