गणेशोत्सवात संशयास्पद व्यक्तींपासून नागरिकांनी सावध रहावे : पोलिस निरीक्षक सचिन सावंत

Sep 6, 2024 - 10:22
 0
गणेशोत्सवात संशयास्पद व्यक्तींपासून नागरिकांनी सावध रहावे : पोलिस निरीक्षक सचिन सावंत

गुहागर : कोणी अनोळखी व्यक्ती रात्री अपरात्री संशयास्पद फिरत असेल परप्रांतीय व्यक्ती कोणतीही वस्तू विकण्याच्या बहाण्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा व्यक्तींची माहिती कळवावी. पोलिस चोवीस तास सेवेत हजर आहेत. गर्दीच्या ठिकाणी सोन्याचे दागिने घालून फिरू नका, बंद घरात मौल्यवान वस्तू ठेऊ नका. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. परप्रांतीयांची पोलिस ठाण्यात नोंद करा आणि गणेशोत्सवात सतर्क राहा, असे जाहीर आवाहन गुहागर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी केले.

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे सन २०२४ यावर्षीच्या गणेशोत्सवा निमित्ताने वाहतूक व्यवस्थापन, मार्केटमध्ये होणारी गर्दी आणि परप्रांतीय किंवा संशयीत व्यक्तींपासून महिलांनी, नागरिकांनी घ्यावयाची काळजी आदी महत्त्वाच्या विषयावर पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी संघटना आबलोली तसेच वडाप संघटना, ट्रॅव्हल्स संघटना, रिक्षा संघटना आदींना मार्गदर्शन केले. निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्यावतीने पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक सावंत यांनी, पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग आपली भूमिका चोख बजावत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही काम करताना हेतू चांगला ठेवा.

कोण चुकीचा वागत असेल तर त्याला समजावून सांगा. सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट टाकू नका. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. मोबाईलमध्ये अनोळखे अॅप, लिंक घेऊ नका. एखाद्या घटनेची पोलिसांना वेळीच खबर द्यावी, असे आवाहन केले.

यावेळी आबलोली बीटचे अंमलदार किशोर साळवी, रविंद्र आठवले, प्रशांत पाटील, सरपंच वैष्णवी नेटके, उपसरपंच अक्षय पागडे, ग्रामसेवक बाबूराव सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, सचिन बाईत, सचिन कारेकर, यशवंत पागडे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow