राजापूर : सागवे आरोग्य उपकेंद्रात १० प्रसूती

Sep 9, 2024 - 10:35
Sep 9, 2024 - 15:39
 0
राजापूर : सागवे आरोग्य उपकेंद्रात १० प्रसूती

रत्नागिरी : गावाजवळील सरकारी संस्थेत प्रसूती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सरसावली आहे. सागवे (ता. राजापूर) आरोग्य उपकेंद्रात सहा महिन्यांत दहा प्रसूती केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात ग्रामीण भागातील महिलांना प्रसूतीसाठी खासगी रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयावर अवलंबून राहावे न लागता गावाजवळच ही सुविधा मिळणार आहे.

आरोग्य उपकेंद्रात प्रसूती करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. राजापूर तालुक्यातील आयुष्यमान आरोग्य उपकेंद्र, सागवे येथे सकाळी सुरक्षित प्रसूती करण्यात आली. त्यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी शिंदे तसेच समुदाय आरोग्य अधिकारी अविनाश वणवे व आरोग्य सेविका शबाना पावसकर सिस्टर उपस्थित होते. एप्रिलपासून आजपर्यंत सागवे उपकेंद्रात एकूण १० सुरक्षित प्रसूती करण्यात आल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी सागवे येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. जनतेने प्रसूती ही उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयासारख्या सरकारी आरोग्य संस्थेतच करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:02 PM 9/9/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow