पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनी भारतात सामील व्हावे, राजनाथ सिंह यांचे आवाहन

Sep 9, 2024 - 15:38
 0
पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनी भारतात सामील व्हावे, राजनाथ सिंह यांचे आवाहन

वी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारं वाहतंय. येथे निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्ष लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं करत आहेत.

संरक्षणंत्री राजनात सिंह यांनी रामबन या विधानसभा मतदारसंघात रॅलीला संबोधित करताना पाकव्याप्त काश्मीवर भाष्य केलं. सोबतच त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) जनतेला थेट भारतात सामील होण्याचे आवाहन केले. आम्ही पीओकेमधील लोकांना आमचे मानतो, असे राजनाथ सिंह म्हणाले.

विकास घडवून आणण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्या

रामबन येथील सभेला संबोधित करताना "जम्मू काश्मीरमध्ये विकास घडवून आणण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्या. आगामी सरकारची स्थापना करण्यासाठी भाजपाला साथ द्या," असे राजनाथ सिंह म्हणाले.

पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनी आमच्यात सामील व्हावे

पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना मला सांगायचे आहे की, पाकिस्त तुम्हाला परदेशी समजतो. पण भारत तुम्हाला पाकिस्तानप्रमाणे समजत नाही. आम्ही तुम्हाला आमच्यातीलच एक समजतो. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनी आमच्यात सामील व्हावे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

370 पुन्हा एकदा कधीही लागू होऊ शकत नाही

राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या युतीवरही टीका केली. भाजपा जोपर्यंत सत्तेत आहे, तोपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा एकदा कधीही लागू होऊ शकत नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह स्टार प्रचारक

राजनाथ सिंह हे जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत भाजपाचे स्टार प्रचारक आहेत. या भागात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील दोन दिवसांचा दौरा केला. आपल्या या दौऱ्यात त्यांनी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तसेच वेगवेगळ्या सभा आणि बैठकांना संबोधित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:08 09-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow