भाजपतर्फे रत्नागिरी शहर प्रभाग ६ साठी गणेशोत्सव स्पर्धा

Sep 11, 2024 - 09:57
 0
भाजपतर्फे रत्नागिरी शहर प्रभाग ६ साठी गणेशोत्सव स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ या भागामध्ये नीलेश आखाडे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत घरगुती गणेशोत्सव स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अनेक गणेश भक्तांनी सहभाग नोंदविला असून या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आणखी दोन दिवस शिल्लक आहेत.

भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर, खासदार नारायण राणे, माजी आमदार बाळ माने, द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून अजूनही यामध्ये कोणाला सहभागी व्हायचे असेल तर दोन दिवसांत आपल्या घरगुती गणेशोत्सव सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ ९८६०६२५७४० या व्हॉट्स ॲप क्रमांकावर ती पाठवावेत, असे आवाहन नीलेश आखाडे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 11-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow