मुख्यमंत्री माझी शाळा योजनेत लांजा जि. प. शाळा क्र. ५ रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम
रत्नागिरी : लांजा येथील जिल्हा परिषद शाळा क्र. ५ या शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा जिल्ह्यात प्रथम क्रमांकासाठी निवड झाली आहे.
लांजात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा २ अभियानचे नुकतेच मूल्यांकन झाले होते. या अभियानात लांजा तालुक्यात प्राथमिक शाळा गटात शाळा क्र. ५ ही शाळा प्रथम आली होती. जिल्हास्तरीय समितीने जिल्ह्यातील शाळांचे मूल्यांकन करून त्यात लांजा शाळेला प्रथम क्रमांक दिला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा अभियानाला प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या अभियानाची नोंद झाली आहे.
या अभियानात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या शाळांना भरीव रकमेची बक्षिस ठेवण्यात आली आहेत. लांजा तालुक्यात सर्व शाळांनी या अभियानात सहभाग घेतला. प्रत्येक शाळेचे १५० गुणांमधून मूल्यमापन केले जाते.
लांजा शाळा क्र. ५ मध्ये विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यामुळेच या अभियानात शाळेची निवड झाली. त्याबद्दल गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी विनोद सावंत, केंद्र प्रमुख चंद्रकांत पावसकर यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 11-09-2024
What's Your Reaction?