रत्नागिरी : हर्चेतील वाडेकर कुटुंबात एक गौरी, गणपती प्रथा

Sep 11, 2024 - 10:15
 0
रत्नागिरी : हर्चेतील वाडेकर कुटुंबात एक गौरी, गणपती प्रथा

पावस : नवे घर बांधले की गणपती घरी आणण्याची प्रथा कोकणात सर्रास दिसते. लांजा तालुक्यातील हर्चे येथील वाडेकर कुटुंबीयांचा याला अपवाद आहे. गावातील पनोरची खालचीवाडी येथील वाडेकर कुटुंबीयांचा सार्वजनिक गणपती आधुनिक युगात सर्वांच्या औत्सुक्याचा तसेच चर्चेचा विषय ठरत आहे.

या कुटुंबात पूर्वापार फक्त दोनच गणपती होते. सध्या १६ कुटुंबांच्या गणरायाची प्रतिष्वापना विलास वासुदेव वाडेकर यांचे घरी  केली जाते. मूळ देवही तिथेच आहे. सुधीर रघुनाथ वाडेकर यांच्याकडे पिढयनपिढया स्वतंत्र अधिपती आहे. फार पूर्वी देवघरात सर्वजण एकत्र येऊन गणपतीची आरास करत यामध्ये मंडपीची सजावट लक्षवेधी असे. आजही मंडपी पिवळा सोनतळ, तिरडा, कांगण्या, कवंडले एकत्र बांधून सजवली जाते. गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यावर सुखाचे गाऱ्हाणे घातले जाते, तिथून पुढे नित्यनेमाने आरती केल्या जातात.

घराघरांतून आलेला नैवेद्य पुजारी बाप्पाला दाखवतात. गौरीचा गणपती असल्याने गौरी विसर्जनालाच लंबोदराचा निरोप घेतला जातो. तत्पूर्वी गौरी आवाहनावेळी तीळ, हळद, तिरडा यांची रोपे रोवलीमध्ये घेऊन पहऱ्यावरुन  वाजतगाजत अत्यंत श्रद्धेने सुवासिनी गौरी घरी आणतात. गौरीला कुंडा आणि तांदूळमिश्रित भाकरी, पालेभाजी, दही असा पहिला नैवेद्य विलास तानू वाडेकर यांच्याकडचा असतो, आरत्या, फुगक्या, जाखडी यांनी गौरी जागवल्या जात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 9/11/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow