चिपळूण पालिकेकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारा बॅनर जप्त

Sep 12, 2024 - 11:08
Sep 12, 2024 - 11:13
 0
चिपळूण पालिकेकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारा बॅनर जप्त

चिपळूण : पाग पॉवरहाऊस परिसरातील महामार्गावर मधोमध गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी झळकणारे बॅनर चिपळूण पालिकेने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मोठ मोठे बॅनर हटल्याने येथील परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.

लोकप्रतिनिधींमार्फत वाढदिवस, गणेशोत्सवानिमित्त चिपळूण शहरात सध्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरची स्पर्धाच लागल्याचे दिसून येत आहे. रस्तोरस्ती, गल्लोगल्ली व महामार्गावरही मोठ-मोठे बॅनर झळकताना दिसतात. रस्त्यांवर अपघात झाले तरी चालतील; पण आमचे बॅनर तिथे लागलेचे पाहिजेत, अशीच काहीशी त्यांची इर्षा असते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाग पॉवर हाऊस परिसरात सध्या वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. कोणते वाहन कुठून येते, कुठे जाते हेच कळत नाही. यामुळे येथे छोटे-मोठे अपघातही सातत्याने घडत आहेत. स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडताना अक्षरशः जीव मुठीत घ्यावा लागत आहे. अशातच काही लोकप्रतिनिधी संधीचा फायदा घेत या परिसरात मोकळ्या जागेवर फलक, बॅनर उभारत आहेत. गणेशोत्सवानिमित्तही काहींनी लगबगीने येथे आपल्या बॅनरसाठी जागा बुक केली. चार-पाच मोठ-मोठे बॅनर उभारले गेले. या बॅनरमुळे समोरून येणारे वाहन दिसून येत नव्हते. परिणामी, वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झाली होती. अपघाताची शक्यता होती.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 9/12/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow