पाली पेट्रोल पंप येथे दोन मोटारींचा अपघात

Sep 12, 2024 - 14:41
 0
पाली पेट्रोल पंप येथे दोन मोटारींचा अपघात

रत्नागिरी : तालुक्यातील पाली पेट्रोल पंप येथे दोन मोटारीत झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. संशयित मोटारचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

सुनील असोक ओगले (रा. आशियाना कॉम्प्लेक्स पनवेल जि. रायगड) असे संशयित मोटारचालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) सायंकाळी मुंबई ते गोवा जाणाऱ्या महामार्गावर पाली पेट्रोलपंपानजीक घडली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक अशोक डांगे (रा. हातखंबा डांगेवाडी, रत्नागिरी) यांच्या मालकीची मोटार घेऊन पालीहून रत्नागिरीकडे येत असताना बालाजी गेस्ट हाऊस रस्त्यावर मुंबईहून येणाऱ्या मोटारवरील संशयित चालक सुनील ओगले यांनी वाहन अतीवेगाने चालवून डांगे यांच्या गाडीला धडक देऊन अपघात केला. या अपघातामध्ये सुनील अशोक ओगले (वय ६८), दीपक अशोक डांगे, प्रियांका कांबळे (२६), अधिरा शोबीत कांबळे (दीड वर्षे) हे जखमी झाले. याप्रकरणी डांगे यांनी ग्रामीण
पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 12-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow