गोगटे जोगळेकर महाविद्यालयात क्विझर स्पर्धा

Sep 12, 2024 - 14:44
 0
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात क्विझर स्पर्धा

रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) संगणकशास्त्र विभागाने क्विझर २०२४ स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. या स्पर्धेत अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील १२ वीच्या २५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संगणकशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांना त्यांचे संगणकाविषयीचे ज्ञान तपासण्याची संधी मिळाली.

क्विझर २०२४ स्पर्धेचा निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय याप्रमाणे) - बारावी वर्ग ब - अथर्व बंदसोडे, किरण वाघमोडे, ओम नाटेकर. बारावी क- जैद फणसोपकर, वेधास शिंदे, जुहेयर वस्ता. बारावी वर्ग ड- फवाज बिजापुरी, फैजान म्हसकर, रुशन गोदड. बारावी इ वर्ग- वेदांत कातळे, उदयकुमार वालीकर, साहिल रेवाळे. संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे आणि विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि एमएस्सी- २ मधील विद्यार्थी स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वी झाली. या स्पर्धेला प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, शास्त्र विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र विभाग समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी आणि शास्त्र विभाग प्रमुख प्रा. दिलीप शिंगाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 12-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow