Rain Updates : पावसाचा जोर ओसरला..! आज कुठे, किती पडणार पाऊस? जाणून घ्या

Sep 13, 2024 - 09:34
 0
Rain Updates : पावसाचा जोर ओसरला..! आज कुठे, किती पडणार पाऊस? जाणून घ्या

मुंबई : राज्यभरामध्ये सरासरीपेक्षा पाऊस पडला असून राज्यभरातील सर्वच मोठी धरणांनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते.

त्यानंतर आता पावसाचा जोर काहीसा कमी होताना दिसत आहे.

दरम्यान, राज्यभरातील विविध ठिकाणी सध्या पावसाच्या सरी सुरू आहेत. तर मराठवाड्यात अजूनही पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील कामे करताना अडथळा निर्माण होताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला पडलेल्या पावसामुळे कापसाची बोंडे सडली असून मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. या नुकसानीमुळे कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

तर १३ सप्टेंबर रोजी हवामान विभागाकडून राज्यभरात कुठेच पावसाचा इ्शारा देण्यात आलेला नाही. त्याबरोबरच पुढील दोन दिवसांतही कुठेच पाऊस पडणार नाही असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून दोन दिवसानंतर मात्र विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर पुन्हा पाऊस सक्रिया होण्याची शक्यता आहे.

काल मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावासाच येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. तर उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला नव्हता तरीही मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा जोर कायम होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 13-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow