खेड : चाकरमान्यांसाठी गोळीबार मैदानातून जादा बसेस

Sep 13, 2024 - 12:20
 0
खेड : चाकरमान्यांसाठी गोळीबार मैदानातून जादा बसेस

खेड : खेड बसस्थानकात जादा बसेस उभ्या करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने गतवर्षापासून महाडनाका येथील गोळीबार मैदानातून जादा बसेस सोडण्यात येत आहेत.

यंदाही दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर परतीला निघालेल्या प्रवाशांसाठी सोमवारी रात्रीपासून गोळीबार मैदानातून जादा बसेस सोडण्यात येत आहेत. पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर परतीला निघणाऱ्या प्रवाशांच्या आरक्षित बसेसही गोळीबार मैदानातून सुटणार असल्याची माहिती आगारप्रमुख रणजीत राजेशिर्के यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 13-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow