चिपळुणातील मुस्लिम समाजाच्या सभागृहासाठी सव्वा कोटीचा निधी

Sep 17, 2024 - 13:48
 0
चिपळुणातील मुस्लिम समाजाच्या सभागृहासाठी  सव्वा कोटीचा निधी

चिपळूण : जो शब्द दिला तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे हीच आमदार शेखर निकम यांची ओळख आहे. त्यामुळे असा आमदार आमच्या चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाला लाभला हे आमचं भाग्य आहे. त्यांनी चिपळूण तालुक्यातील मुस्लिम समाजावर प्रेम केलं आणि सहकार्यही केले. समाजाच्या सभागृहाला त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तब्बल सव्वा कोटी निधी मिळवला. आम्हाला आपल्याला मंत्री म्हणून पाहायचं आहे. त्यासाठी पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही चिपळूण तालुका मुस्लिम समाज पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आमदार निकम यांना दिली.

चिपळूण तालुका मुस्लिम समाजाकडून अत्याधुनिक सभागृहाची निर्मिती करण्यात येत असून त्यासाठी बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. यासाठी समाजाच्यावतीने निकम यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी निधी आणून देण्याचा शब्दही आमदार निकम यांनी दिला होता. अखेर दिलेला शब्द आमदार निकम यांनी उपमुख्यमंत्री पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून खरा करून दाखवला.

शुक्रवारी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सलीम कास्कर, कार्याध्यक्ष नाझीम अफवारे, उपाध्यक्ष शमशुद्दीन सनगे, खजिनदार रऊफ वांगडे, यासिन दळवी, बरकत पाते, इम्रान खतिव, इम्रान कोंडकरी, जहिर पुंडलिक, खालीद दाभोळकर, डॉ. अब्बास जबले यांसह अन्य सदस्यांनी जाऊन आमदार सावर्डेत निकम यांचा सत्कार केला.

सर्वांना सोबत घेऊन विकास करणार 
आज जो निधी प्राप्त झाला तो निव्वळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे. यापुढेही या सभागृहासाठी अन्य वेगवेगळ्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मी केवळ मुस्लिम समाजासाठी नव्हे तर माझ्या मतदारसंघात असणाऱ्या अनेक समाजांच्या सभागृहासाठी निधी दिलेला आहे. मी करत असलेल्या कोणत्याही कामाकडे राजकीय भावनेतून पाहत नाही.

आपल्याला सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकास साधायचा आहे. त्यामुळे यापुढेही सर्वांसाठी काम करत राहू, अशी ग्वाही आमदार शेखर निकम यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना दिली. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 17/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow