रत्नागिरी : शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीचे २२ रोजी साडवली येथे मार्गदर्शन शिबिर

Sep 19, 2024 - 14:15
 0
रत्नागिरी : शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीचे २२ रोजी साडवली येथे मार्गदर्शन शिबिर

देवरुख : महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या साडवली येथील पराग बीएड कॉलेज तर्फे जिल्ह्यातील बीएड पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक (बीएड) पात्रता परीक्षा टीईटीचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार २२ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत पराग बी.एड. कॉलेज, साडवली येथे होणार आहे. 

या शिबिरात प्रा. तेजराव गाडेकर (सेवानिवृत्त उप शिक्षणाधिकारी) हे ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुकांनी आपली नावे नोंदवावीत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नोंदणी करुन या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य, डॉ. आय सी. शेख. पराग बी.एड. कॉलेज, साडवली यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:43 19-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow