Lalbaugcha Raja Visarjan 2024 : 'लालबागचा राजा'चे 23 तासांनी विसर्जन संपन्न

Sep 18, 2024 - 12:29
Sep 18, 2024 - 15:30
 0
Lalbaugcha Raja Visarjan 2024 : 'लालबागचा राजा'चे 23 तासांनी विसर्जन संपन्न

मुंबई : तमाम गणेशभक्तांच्या श्रद्धेचं स्थान असलेला लालबागच्या राजाचं जवळपास 23 तासांनी विसर्जन झालं आहे. पुढच्या वर्षी लवकर या... चैन पडे ना आम्हाला... अशी भावनिक साद घालत लालबागच्या राजाला भाविकांनी निरोप दिला आहे.

नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला, लालबाग-परळकरांसोबतच संपूर्ण गिरणगाव आणि जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेला लालबागच्या राजाने दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर भक्तांचा निरोप घेतला आहे.

बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यासाठी त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाने कडेकोट व्यवस्था केली होती, संपूर्ण यंत्रणाही सज्ज होती.

मंगळवारी सकाळी साधारण 11 वाजता मंडपातून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला होता. त्यानंतर लालबागचा राजा हा लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग,चिंचपोकळी पूल, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, कुंभारवाडा,सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी.टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस असा प्रवास करुन गिरगाव चौपाटीवर दाखल होतो.

गेल्या 10 दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि बॉलीवूड तारे-तारकांनी लालबागचा राजाच्या मंडपात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते.

अखेर सर्वांना आशीर्वाद देत लालबागच्या राजाने भावपूर्ण वातावरणात भक्तांचा निरोप घेतला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 18-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow