रत्नागिरी : 'बँक ऑफ इंडिया'तर्फे 'समझौता दिवस'

Sep 18, 2024 - 15:31
 0
रत्नागिरी : 'बँक ऑफ इंडिया'तर्फे 'समझौता दिवस'

रत्नागिरी : बँक ऑफ इंडियाने मागील महिन्यात आयोजित केलेल्या 'समझौता दिवसा'ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ग्राहकांच्या आग्रहाखातर बँक ऑफ इंडियाने सर्व शाखांत आणि विभागीय कार्यालयात १८ ते २१ सप्टेंबर या कालावधीत समझौता दिवसाचे आयोजन केले आहे.

याचा लाभ एकरकमी तडजोड योजनेंतर्गत निष्क्रीय (एनपीए) कर्ज खातेदारांना होणार आहे. हा समझौता दिवस विशेषतः एनपीए कर्जदारांसाठी आहे. जे कर्जदार व्यवसायातील किंवा वैद्यकीय परिस्थितीमुळे, इतर परिस्थितीजन्य कारणांमुळे कर्जाची परतफेड वेळेत करु शकले नाहीत, त्यामुळे सदर खाती झालेली आहेत. अशांसाठी बँक ऑफ इंडियाने या सुवर्णसंधीचे आयोजन केले आहे. बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखांत तसेच रत्नागिरी विभागीय कार्यालयात होणाऱ्या या विशेष एकरकमी तडजोड योजनेत (ओटीएस) कर्जदारांनी नजिकच्या शाखेत मोठ्याप्रमाणात सहभागी होऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन बँक ऑफ इंडियातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 18-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow