शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील तर, मग अजित पवार कोण? बच्चू कडूंचा अमित शाहांना सवाल

Jul 22, 2024 - 16:02
 0
शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील तर, मग अजित पवार कोण? बच्चू कडूंचा अमित शाहांना सवाल

मुंबई : शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील, तर अजितदादा कोण आहे? असा सवाल बच्चू कडू यांनी केला. ते म्हणाले की, अमित शाहांच्या तोंडातून चुकीचे निघाले असतील.

ते बऱ्याचदा विसरून जातात आणि बऱ्याचदा चुकीचे बोलतात आणि मग अंगलट येते, असेही बच्चू कडू यांनी सांगितले की, दरम्यान शरद पवार महायुतीमध्ये जाणार नाहीत. अजित पवार यांनी शरद पवारांसोबत जाऊ नये असेही बच्चू कडू यांनी नमूद केले.

ज्यांना काम जास्त आहे त्यांना कमी पगार आहे ज्यांना कमी काम आहे त्यांना जास्त पगार आहे. अजित अजित पवार यांच्याकडून अंगणवाडी सेविकेला असे उत्तर अपेक्षित नाही. अंगणवाडी सेविकांचे दहा वीस हजार वाढवले पाहिजे, आम्ही आलो तर नक्की वाढवू, असेही बच्चू कडू म्हणाले.

संजय राऊतांचा हल्लाबोल

दरम्यान, शरद पवारांवरील टीकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत हे सांगायला आम्हाला लाज वाटते. अमित शहांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ते अशोक चव्हाण आज अमित शहांच्या शेजारी बसलेले दिसतात. त्यांचे भाजपचे सरकार आहे. शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि मोदीजींनी स्वत: त्यांची प्रशंसा केली, मला वाटते की मोदी आणि शहा यांच्यात काही भांडण आहे, त्यामुळेच हे मतभेद दिसून येत आहेत.

शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार

पुण्यात झालेल्या भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असल्याचे अमित शाह म्हणाले. त्यांनी आपल्या देशात भ्रष्टाचाराचे संस्थानिकीकरण केले आहे. मी शरद पवारांना सांगायला आलो आहे की, महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यावर मराठा समाजाला आरक्षण मिळते आणि शरद पवारांचे एमव्हीए सरकार सत्तेवर आले की मराठा आरक्षण संपते.

त्याचवेळी काँग्रेसवर निशाणा साधत अमित शहा म्हणाले की, काँग्रेस कधीही गरिबांचे कल्याण करू शकत नाही. केवळ भाजपच जनहित आणि गरिबांचे कल्याण करू शकते. ते म्हणाले की, काँग्रेस दलित, आदिवासी आणि गरीब लोकांच्या उन्नतीसाठी काम करत असल्याच्या अफवा पसरवण्यात व्यस्त आहे, पण आम्ही विचारतो की, एवढी वर्षे सत्तेत असताना त्यांना दलित, आदिवासी आणि गरीबांसाठी काम करण्यापासून कोणी रोखले होते? राजीव गांधींचा नारा होता हम दो, हमारे दो, पण गेल्या 15 वर्षांपासून ते विरोधी पक्षात बसले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:31 22-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow