राजापुर : गोखले कन्याशाळेचा पट वर्षभरात पाचपटीने वाढला

Sep 19, 2024 - 12:26
Sep 19, 2024 - 14:29
 0
राजापुर : गोखले कन्याशाळेचा पट वर्षभरात पाचपटीने वाढला

राजापूर : जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढवण्याचे किंवा स्थिर ठेवण्याचे आव्हान सर्वत्रच आहे. राजापूर शहरातीत मुलींची पहिली शाळा म्हणून ओळख जाणाऱ्या गोखले कन्याशाळेने कमी झालेला पट वाढवण्यात यश मिळवाले आहे. डिजिटल शिक्षणपद्धती, सेमी इंग्रजी यांसह गुणवत्तावाढीसाठी राबवलेले विविध उपक्रम पामुळे वर्षभरात कन्याशाळेची विद्यार्थिनीची संख्या पाचपटीने वाढली आहे. एक वर्षांपूर्वी या शाळेचा पट १२ होता. यंदा ५८ विद्यार्थिनी आहेत.

शंभर वर्षांपूर्वी राजापूर शहरात मुलीची पहिली शाळा सुरू करण्यात आली त्यामधून आतापर्यंत हजारो मुलींनी शिक्षणाचे धडे घेत घेलते. गेल्या काही वर्षामध्ये प्रशालेच्या घटलेल्या पटसंख्येबाबत चिंता व्यक्त केली जात होती. ही बाब तक्षात घेऊन शाळा व्यवस्थापनाने भौतिक सुविधांसह विद्यार्थांची गुणवत्तावाढीसाठीचे उपक्रम राबवण्यास सुरवात केली त्यामुळे प्रशालेचा पट वाढवण्यास मदत होत आहे. त्यासाठी सामानिक कार्यकर्ते राजाभाऊ रसाळ, शाळा व्यवस्थापन ममिली आणि शिक्षकांनी कंबर कसली. राजाभाऊ रसाळ नीलेश कुडाळी, दीपक दांडेकर, शिवाजी नागरवाड, राधिका गुणे यांसह अन्य दात्यांच्या सहकार्याने शाळा परिसरात सुसज्ज मैदान, परसबाग सांस्कृतिक सभागृह आदी भौतिक सुविधा उभारल्या. १२ टॅब, १ डेस्कटॉप आणि स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून मुलांना डिजिटल शिक्षण देण्यात आले. शिष्यवृत्तीसह जिल्हा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेतील यशाचा टक्क्च वाढवण्यावर भर दिला पालकांसह विद्यार्थ्यांचा कल तक्षात घेऊन गेमी इंग्रजीचेही शिक्षण उपलब्ध करून दिले. शैक्षणिक दर्जा वाढत्यामुळे आपसूकन्य कन्याशाळेतील पट पाचपटीने वाढाला आहे गुवत्तावाढीसाठी मुख्याध्यापिका सायली भडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षिका सुचिता तवटे, मिताली आंगणे, सुहास काडगे हे शाळेत मेहनत घेत आहेत.

कन्याशाळेत विविध सुविधा देतानाच विद्यार्थीनीच्या गुवतावाढीकडे अधिक लक्ष दिले त्यातून नवनवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक यांनी राजापूर शहर आणि परिसरातील पालकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन शाळेतील सुविधांविषयीची माहिती दिली. या प्रयत्नानंतर विद्यार्थीनी प्रवेशाला प्रतिसाद मिळाला सुहास काडगे, शिक्षक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow