दक्षिण कोरियात बॅटरी फॅक्टरीला आग, 20 जणांचा मृत्यू

Jun 24, 2024 - 15:41
 0
दक्षिण कोरियात बॅटरी फॅक्टरीला आग, 20 जणांचा मृत्यू

सेऊल : दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलजवळ रविवारी लागलेल्या आगीत बॅटरी निर्मिती करणारी फॅक्टरी (Battery Factor Fire) जळून खाक झाली आहे. या कंपनीतून सोमवारी 20 मृतदेह हाती लागले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आग लागल्यानंतर या ठिकाणाहून अद्याप 23 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. या लोकांचे मृतदेह शोधण्याचं काम सुरु आहे. बॅटरी कंपनीत किती लोक कामावर होते याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. आगीत ड्यूटी रजिस्टर देखील आगीत जळून काक झालं आहे. रविवारी या ठिकाणाहून एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. तर, तीन जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे.

दक्षिण आफ्रिकेतील वृत्तसंस्था Yonhap News च्या माहितीनुसार सेऊलपासून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्वासोंगमध्ये लिथियम बॅटरी उत्पादक कंपनी एरिसेलच्या एका प्लाँट कंपनीत रविवारी सकाळी 10.30 वाजता आग लागली होती. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशल आलं. सोमवारी देखील अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरु करण्यात आलं होत. दक्षिण आफ्रिकेच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता असलेल्या 23 जणांपैकी 20 जण विदेशी नागरिक आहेत. यामध्ये चीनच्या नागरिकांचा देखील समावेश आहे. आग लागलेल्या ठिकाणी छोटे छोटे स्फोट असल्याचं देखील समोर आलं आहे.

आग लागल्यानंतर स्फोट

अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार रविवारी एका कामगाराला हॉर्ट अटॅक आला होता. रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला होता. एक जण गंभीर जखमी झालाहोता. तर, दोघे किरकोळ जखमी झाले होते.प्राथमिक माहितीनुसार तीन मजली इमारतीत आगल लागली होती. आग विझवताना अग्निशमन विभागाल फार अडचणींचा सामना करावा लागला. कारण, बॅटरींचे स्फोट होत होते.

सरकारनं बोलावली आप्तकालीन बैठक

बॅटरींचे स्फोट होत असल्यानं आग वेगानं वाढत होती. त्यामुळं आग वाढत होती. त्यामुळं कंपनीत काम करणारे लोक बाहेर येऊ शकत नव्हते. या ठिकणी 35 हजार बॅटरी संच होते. यानंतर दक्षिण कोरियाच्या सरकारनं राष्ट्रीय आपत्कालीन बैठक बोलावली होती. सरकारी यंत्रणांनी आणि स्थानिक सरकारनं आगीवर नियंत्रण मिळवून जीवंत असलेल्या लोकांना वाचवण्याचे आदेश देण्यात आले होते. राष्ट्रपती यून सूक योल यांनी मृतांची संख्या वाढू नये यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:52 24-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow