खेड शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा

Sep 20, 2024 - 10:53
 0
खेड शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा

खेड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भरणे येथील जॅकवेलमधील तांत्रिक बिघाड महावितरणने दूर करत पाणीपुरवठा सुरळीत झाला असला तरी बहुतांश भागात कमी दाबाच्या पाणीसमस्येचा फेरा कायम आहे. कमी दाबाच्या पाण्याची समस्या भेडसावणाऱ्या भागात पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करून तहान भागवली जात आहे.

शहरातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. क्षेत्रपालनगर, शिवतररोड, ब्राह्मणआळी, कुवारसाई, दापोलीनाका, सोनारआळी, एकविरानगर आदी परिसरात कमी दाबाच्या पाणीसमस्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी भरणे येथील रोहित्रामध्ये झालेल्या बिघाडामुळे पाणीपुरवठ्याचा पुरता बोजवारा उडाला होता. नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान शमवावी लागली होती. पंपातील विघाड दूर झाल्यानंतर विस्कळित पाणीपुरवठा पूर्ववत झाला असला तरी कमी दाबाच्या पाण्याची समस्या कायम आहे. शहरातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवण्याची वेळ पालिकेवर ओढवली आहे. पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून अजूनही कुठल्या उपाययोजनांचा अवलंब केला जात नसल्याने याचा नागरिकांना फटका बसत आहे. टँकरच्या पाण्यावर आणखी किती दिवस तहान भागवायची असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

प्रश्न कायमचा निकाली काढा
शहरातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. क्षेत्रपालनगर, शिवतररोड, ब्राह्मणआळी, कुवारसाई, दापोलीनाका, सोनारआळी, एकविरानगर आदी परिसरात कमी दाबाच्या पाणी समस्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी भरणे येथील रोहित्रामध्ये झालेल्या बिघाडामुळे पाणीपुरवठ्याचा पुरता बोजवारा उडाला होता. तांत्रिक बिघाड महावितरणकडून दूर करण्यात आला आहे, मात्र पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow