रत्नागिरी : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Jul 13, 2024 - 17:22
 0
रत्नागिरी : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : राज्यातील ६५ वर्षे व त्यावरील नागरिकांकरिता आखण्यात आलेल्या वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधणे, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मनःस्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या योजनेअंकर्गत लाभार्थी व्यक्ती वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेली असावी. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य, केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे. त्या व्यक्तीने मागील ३ वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार रुपये थेट लाभ वितरण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेत आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, रत्नागिरी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:51 13-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow