आगामी दोन दिवस कोकणात विजांसह गडगडाटी पावसाचा इशारा

Sep 21, 2024 - 09:47
 0
आगामी दोन दिवस कोकणात विजांसह गडगडाटी पावसाचा इशारा

रत्नागिरी : गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यात पवासाने उघडीप दिली आहे. मात्र, पुढील दोन दिवस किनारपट्टी भागात विजांच्या कडकडाटासह गडगडाटी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. याबरोबर कोकणातील पावसाचा परतीचा प्रवासही शनिवारी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारीही पावसाने सकाळपासून पावसाने उघडीप घेतली. मात्र, त्यामुळे वाातवरण कोरडे झाले. कोरड्या वातावरणाने तापमानही वाढले. सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात तापमान २९ अंश सेल्सिअस होते. दुपारी १२ वाजता यामध्ये १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ झाली. त्यामुळे उकाडा वाढला. अधुनमधून मळभ दाटून पावसाचीशक्यता निर्माण होत होती. मात्र, पुन्हा वातावरण कोरेडे होऊन कडक उन्हाचे सातत्य राहत होते.

शनिवारपासून दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील अन्य भागात विजांसह गडगडाटी पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे मोसमी पावसाचा परताची प्रवास सुरू होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दि. २५ सप्टेंबरनंतर पाऊस यंदाचा प्रवास संपविण्याचा शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान, शुक्रवारी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर तालुक्यांत अनुक्रमे ९ आणि १.२० मि.मी. पावसाची नोंद झाली. उर्वरित तालुके पर्जन्यतालिकेत नीरंक म्हणजे कोरडे होते. जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार मि.मी.च्या सरासरीने ३५ हजार ६३८ मि. मी. एकूण पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ११७ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत १७ टक्के पाऊस जादा झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 21-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow